जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२५
नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने दणदणीत विजय मिळवत एकूण ११ जागांवर बाजी मारली असून, भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही शिंदे गटाच्या उमेदवार सुनिता किशोर पाटील या दुसऱ्या फेरीअखेर तब्बल ७७०० मतांनी आघाडीवर असल्याने नगराध्यक्षपदावर शिंदे गटाचीच मोहोर उमटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रभाग क्रमांक १ अ मधून मनिषा सुरेंद्र बाविस्कर आणि १ ब मधून किशोर गुणवंत बारावकर हे दोन्ही उमेदवार शिवसेना (शिंदे गट) तर्फे विजयी झाले.
प्रभाग क्रमांक २ अ मधून संजय नाथालाल गोहिल तर २ ब मधून वैशाली छोटुलाल चौधरी यांनी विजय मिळवत शिंदे गटाचा बालेकिल्ला मजबूत केला.
प्रभाग क्रमांक ३ अ मधून भाजपच्या कविता विनोद पाटील यांनी विजय मिळवला, तर ३ ब मधून शिवसेना (शिंदे गट) चे सतीश पुंडलिक चेडे विजयी झाले.
प्रभाग क्रमांक ४ अ मधून रफिक गफ्फार बागवान आणि ४ ब मधून रशीदाबी शब्बीर शेख हे दोन्ही उमेदवार शिंदे गटाकडून विजयी झाले.
प्रभाग क्रमांक ५ अ मधून खनसा सलीम बागवान आणि ५ ब मधून संजय त्र्यंबक चौधरी यांनी विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक ६ अ मधून रहेमान बिस्मिल्ला तडवी आणि ६ ब मधून प्रांजल सुमित सावंत यांनी देखील शिंदे गटाचा विजय निश्चित केला.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) च्या सुनिता किशोर पाटील या दुसऱ्या फेरीअखेर ७७०० मतांनी आघाडीवर असून, त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या निकालामुळे नगरपालिकेवर शिवसेना (शिंदे गट) ची एकहाती सत्ता स्थापन होणार असून, कार्यकर्त्यांनी निकालानंतर मोठा जल्लोष केला. विजयाचे श्रेय संघटनबळ, प्रभावी प्रचार आणि स्थानिक पातळीवरील मजबूत पकड यांना दिले जात आहे.





















