जळगाव : प्रतिनिधी
शहरतील सुरत रेल्वे गेटजवळ सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास प्रचंड ट्रॅफिक जाम झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी नगर उड्डाणपूल बंद असल्याने नागरिकांना हा मानसिक तास सहन करावा लागत आहे.
आज सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी नगरातून जाणारी वाहतूक सुरत रेल्वे गेटजवळ रेल्वे जात असताना बंद झाले होते . यावेळी प्रचंड ट्रॅफिक जाम झाली होती. यावेळी सकाळी शाळेत व महाविद्यालयात जाणाऱ्य विद्यार्थ्यांना ना याचा नेहमीच त्रास आहे. परंतु प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ये जा करणारे नागरिक करू लागले आहे.
शेकडो नागरिक करतात ये-जा
शहरातील शिवाजी नगर ते दूध फेडरेशन परिसरापर्यंत तर के.सी.पार्क, राजाराम नगर यासह ग्रामीण भागातील कानळदा, आव्हाने, फुकनगरी येथील नागरिक सकाळी व संध्याकाळी याच सुरत रेल्वे गेट ओलांडून जावे लागते व हे गेट सकाळी व संध्याकाळी एका वेळेस बंद झाले कि दोन दोन गाड्या गेल्याशिवाय उघडत नाही याचा फटका शाळेत जाणारे विदयार्थी तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांनाही नेहमी होत असतो.
