जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२६
जळगाव शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यात आले. ज्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवून लाखो मराठी मनांना स्वाभिमानाची ताकद दिली, अशा बाळासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करताना प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यांत अभिमान व हृदयात निष्ठेची ज्वाला दिसून येत होती.
या वेळी संपूर्ण परिसर “बाळासाहेब अमर रहें”, “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद” अशा गगनभेदी जयघोषाने दुमदुमून गेला. बाळासाहेबांचे विचार, त्यांचा कणखर स्वभाव आणि अन्यायाविरुद्धची निर्भीड भूमिका आजही शिवसैनिकांना लढण्याची प्रेरणा देत असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात ठळकपणे जाणवत होती.
या भावनिक क्षणी माजी जि प सदस्य प्रतापभाऊ पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख शाम कोगटा, शिवसेना महानगरप्रमुख संतोष पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जितेंद्र गवळी, नगरसेवक मनोज चौधरी यांच्यासह गौरव सोनवणे, सागर सोनवणे, शिवसेना समनव्यक सोहम विसपुते, राहुल नेतलेकर,दीपक पाटील, राजेंद्र सपकाळे, सोनू तायडे, विशाल परदेशी, क्रिस संकत, कुणाल तायडे, प्रवीण बिऱ्हाडे, नीरज वाणी, विशाल निकम, आकाश पाटील, चेतन परदेशी, पवन ठाकूर, चेतन तंबोली, अनिकेत बोराडे,शंतनु नारखेडे विनोद सपकाळे, जयेश सोनवणे, राहुल पाटील आदी निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेबांचे विचार हेच आमचे शस्त्र, त्यांचा वारसा हीच आमची ओळख असून, शिवसेना ही केवळ संघटना नसून ती एक विचारधारा आहे—ही भावना या कार्यक्रमातून पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाली.




















