• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कोट घालून दावोसला जावं लागेल!’ : गुलाबराव पाटलांची खोचक फटकेबाजी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 25, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
कोट घालून दावोसला जावं लागेल!’ : गुलाबराव पाटलांची खोचक फटकेबाजी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जानेवारी २०२६ 

जळगाव जिल्ह्यातील मोठे औद्योगिक प्रकल्प शेजारच्या तालुक्यांकडे वळत असल्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त करत स्वपक्षीय आमदार आणि मंत्र्यांवर शालजोडीतील शब्दांत टोलेबाजी केली. “कोकाकोला प्रकल्प जामनेरला गेला, आता १५ हजार कोटींचा प्रकल्प चाळीसगावला गेला. मग आम्ही फक्त बघत बसायचं का? आपण आमदार आहोत की नाही? भानगड केल्याशिवाय काहीच मिळत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त केली.

जळगाव जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित कार्यशाळेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला. “बहुतेक पुढच्या वेळी मलाही ‘कोट’ घालून दावोसला जावं लागेल, तेव्हाच माझ्या वाट्याला काही मिळेल,” असे मिश्किल वक्तव्य करत त्यांनी व्यासपीठावरून फटकेबाजी केली. या वक्तव्यामुळे सभागृहात हशा पिकला असला, तरी त्यामागील राजकीय नाराजी स्पष्टपणे जाणवत होती.

चाळीसगावसाठी १५ हजार कोटींचा प्रकल्प आणण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी दावोसला उपस्थिती लावली होती. यावर अप्रत्यक्ष भाष्य करत गुलाबराव पाटील म्हणाले की, “जामनेरला उद्योग आले, चाळीसगावला आले. आपण दावोसमध्ये गेलो असतो, तर आपल्यालाही काही मिळालं असतं. आता पुढच्या वेळी मी पण दौरा काढतो आणि कोट घालून जातो.”

दरम्यान, बँकांकडून छोट्या उद्योजकांना होणाऱ्या त्रासावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “माझी बँकांशी कोणतीही दुश्मनी नाही. पण काही बँका छोट्या उद्योजकांना विनाकारण त्रास देतात. हे वेळीच थांबवा. अन्यथा मला बँकांशी थेट दुश्मनी घ्यावी लागेल. गुलाबराव पाटील काय चीज आहे, हे त्यांना कळेल,” अशा शब्दांत त्यांनी बँक अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला.

जळगाव एमआयडीसीला ‘डी प्लस’ दर्जा मिळवतानाच्या आठवणी सांगताना त्यांनी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही निशाणा साधला. “आम्ही ११ आमदार निवडून दिले, सरकार आमच्यामुळेच बसले. तरीही आम्हाला दूर ठेवण्यात येत होतं. देसाई साहेब आमच्याकडे पाहायलाही तयार नव्हते. अखेर एका बैठकीत मी त्यांना स्पष्ट विचारलं – ‘आम्ही काय दुसऱ्याची लेकरं आहोत का?’ त्यानंतर बराच गदारोळ झाला आणि शेवटी जळगावला न्याय मिळाला,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

गुलाबराव पाटील यांच्या या परखड आणि मिश्किल वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Related Posts

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group