• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 7, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ फेब्रुवारी २०२६

वडिलांच्या उपचारासाठी त्यांना दुचाकीवरून जळगावकडे घेऊन जाणाऱ्या पिता-पुत्रावर काळाने घाला घातला. घार्डी फाटा परिसरात अज्ञात ट्रॅक्टरने दिलेल्या भीषण धडकेत मोहम्मद लुकमान ठोके (वय ३९) आणि त्यांचे वडील लुकमान खा मुसे खा ठोके (वय ७५) यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे चोपडा तालुक्यातील लासूर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  चोपडा तालुक्यातील लासूर येथील रहिवासी असलेले लुकमान खा ठोके यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचा मुलगा मोहम्मद लुकमान त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जळगावकडे घेऊन जात होता. शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दोघे दुचाकीवरून लासूर-जळगाव मार्गावरून जात असताना, घार्डी फाटा परिसरात समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की दोघेही गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. मोहम्मद लुकमान हे भंगार विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष आणि वडिलांचे एकाच अपघातात निधन झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, जळगाव येथील नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी शासकीय रुग्णालयात उपस्थित राहून नातेवाईकांचे सांत्वन केले. या दुर्दैवी घटनेमुळे लासूरसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट
क्राईम

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !
जळगाव

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !
जळगाव

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026
पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !
क्राईम

पाचोरा–जळगाव महामार्गावर भीषण अपघातात जळगावातील दोन तरुण ठार !

February 7, 2026
भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ
क्राईम

भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ

February 7, 2026
पद्मालयच्या जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह; निर्घृण खुनाचा संशय !
क्राईम

अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहामागील रहस्य उलगडले : प्रेमसंबंधातून खून, संशयित अटकेत !

February 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026
उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

February 7, 2026
मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

मनपाच्या विशेष सभेत तान्हुल्याने वेधले सर्वांचे लक्ष : नगरसेविकेच्या कुशीत बाळ !

February 7, 2026
सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

सत्तेच्या गुलालातच विकासकामांचा ‘रिमांड’; जळगाव महापौरांसमोरच भाजप नगरसेविकेने दिले निवेदन !

February 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group