जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२६
मैत्रीणीसोबत शिरसोली रस्त्यावरील कुरुक्षेत्र टर्फ परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणावर संशयिताने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना दि. ७ रोजी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य विलास चेके (वय २२, रा. श्रीधरनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित शेख रोशन शेख उस्मान (रा. तांबापुरा) याने आदित्य व त्याच्या मैत्रीणीला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता संशयिताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर आदित्य चेके यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयिताविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ धनराज गुळवे करीत आहेत.




















