• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 9, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२६

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संघटन बळकटीच्या दृष्टीने सातत्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेत असून, त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या कार्याला नवी दिशा देणारी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने कल्पिता पाटील यांची जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र जारी करण्यात आले असून, दि.५ फेब्रुवारी रोजी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. कल्पिता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनिष्ठ, सक्रिय आणि अभ्यासू कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवती काँग्रेसच्या माध्यमातून केली असून, विविध पदांवर जबाबदारीने काम करत पक्षसंघटनेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

विशेष म्हणजे, कल्पिता पाटील या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या सरपंच ठरल्या होत्या. २०१३ मध्ये कल्याणेहोळ गावच्या सरपंचपदाची धुरा त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळत गावविकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावी काम केले. त्यांच्या कार्यकाळात गावाच्या विकासाला गती मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. २०१६ मध्ये दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या परिषदेत भारतातील ५ व्यक्तींची निवड झाली होती त्यात कल्पिता पाटील यांचा सहभाग होता.

पक्षवाढीसाठी त्यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक काम केले असून, विविध आंदोलने, निदर्शने आणि लोकशाही मार्गाने करण्यात आलेल्या संघर्षांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याची त्यांची भूमिका नेहमीच लक्षवेधी राहिली आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला होता.

नियुक्तीपत्रात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जळगाव ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कल्पिता पाटील यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत व अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

फैजपूरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंद घरे फोडली; सोन्याचे दागिने अन् दीड लाखांची रोकड लंपास!

October 31, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

. पैशांच्या वादातून विवाहितेचा छळ? छळाला कंटाळून ४१ वर्षीय महिलेने संपवले जीवन!

October 31, 2026
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !
जळगाव

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !
जळगाव

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!
क्राईम

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

फैजपूरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंद घरे फोडली; सोन्याचे दागिने अन् दीड लाखांची रोकड लंपास!

October 31, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

. पैशांच्या वादातून विवाहितेचा छळ? छळाला कंटाळून ४१ वर्षीय महिलेने संपवले जीवन!

October 31, 2026
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group