• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

श्रद्धा, भक्ती अन्‌‍ सामूहिकतेचा दिसला मंगल संगम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 12, 2026
in जळगाव, सामाजिक
0
श्रद्धा, भक्ती अन्‌‍ सामूहिकतेचा दिसला मंगल संगम
Share on FacebookShare on Twitter

459 भक्तांच्या सहभागातून श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण उत्साहात

जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२६

अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरातील श्री स्वामी समर्थ व श्री अनघालक्ष्मी-श्री गुरुदत्त महाराजांच्या मंदिर परिसरात गुरुवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी आयोजित श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी सहा ते दुपारी चार या वेळेत चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात ठिकठिकाणच्या शेकडो भक्तांनी सहभाग नोफ्लदवत श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक साधनेचा अनोखा अनुभव घेतला. तब्बल दहा तास चाललेल्या या कार्यक्रमाने मंदिर परिसरात भक्ती आणि सकारात्मक उर्जेची मंगलमय अनुभूती असंख्य भक्तांना आल्याचे पाहावयास मिळाले.

वेदमंत्रांच्या गजराने शुभारंभ
कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी वेदमंत्रांच्या गजरात व श्री सिद्धिविनायक गणेशजी, मंगळेश्वर श्री पंचमुखी हनुमानजी, मंगळेश्वरी श्री भूमी माता व श्री मंगळग्रह देवतेच्या आरतीने झाला. यावेळी गणेश पूजनासह विविध देवतांना आवाहन करण्यात आले. वेदमंत्रांच्या गजरात आणि दत्त नामाचा जयघोष करण्यात आला. अमळनेर व चोपडा येथील महिला अनुक्रमे जया पाटील व भारती भदाणे तसेच पुरुष भक्त सोनू पाटील यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा होऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन सुरू झाले. याप्रसंगी लहानग्यांनीही एकाग्र होऊन पारायणाची अनुभूती घेतली.

नियोजनबद्ध वाचन, भक्तांचा सहभाग
श्री गुरुचरित्राच्या संपूर्ण ग्रंथाचे नियोजनबद्ध अध्यायवार वाचन करण्यात आले. तसेच श्री गुरुचरित्रातील आदर्श जीवनमूल्ये आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहेत, असे संबंधितांकडून ओघवत्या शैलीत व सहज-सुंदर शब्दांत सांगण्यात आले.

आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव
सामूहिक पारायणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मनःशांती लाभते, अशी भावना उपस्थित भक्तांनी याप्रसंगी व्यक्त केली. श्री गुरुचरित्र वाचनातून संयम, श्रद्धा आणि सदाचार यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते, अशी प्रतिक्रियाही यावेळी भक्तांनी व्यक्त केली.

महाप्रसादाने समारोप
श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायणासाठी आलेल्या सर्व भक्तांसाठी मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सकाळी साबूदाणे, खोबरा-मावाबर्फी, केळी व चहा देण्यात आला. तसेच समारोपानंतर वरण, भात, बेंगनफ्राय, मटकी रश्श्याची उसळ, पुरी, गावरान तुपातील केशर जिलेबी, पापड, सलाद या महाप्रसादाचा सर्व भक्तांनी आस्वाद घेतला. श्री स्वामी समर्थांच्या भक्तांनी सामूहिक पारायण सोहळा यशस्वितेसाठी बहुमोल श्रम घेतले.

चोपड्यातील भक्तांसाठी बस व्यवस्था
श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायणासाठी अमळनेरसह धुळे, शिंदखेडा, चोपडा, शिरपूर, बोराडी, पारोळा, पाचोरा यासह विविध ठिकाणांहून भक्तांची सहभाग नोफ्लदविला होता. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी अमळनेर येथील आगारप्रमुख श्री. प्रमोद चौधरी यांनी मंगळग्रह सेवा संस्थेच्या विनंतीला मान देऊन तत्काळ श्री मंगळग्रह मंदिरापासून बस उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे भाविकांना बसस्थानकावर जावे लागले नाही. परिणामी त्यांची गैरसोय टळली. या सामाजिक जाणिवेचे भान ठेवत मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आगारप्रमुख तसेच बसवाहक व चालक आर. आर. सोनार व किरण पारधी यांचे आभार मानले आहेत.

मंगलमय ‌‘9‌’ ची प्रचिती!
पारायणाला 459 स्त्री-पुरुष भाविक बसले होते. श्री मंगळग्रहाचा शुभांक ‌‘9‌’ आहे. 459 या अंकाची बेरीजही ‌‘9‌’ येते. मंदिरात झालेल्या पहिल्याच पारायणाला जणू साक्षात श्री मंगल देवतेने ‌‘9‌’ च्या माध्यमातून प्रचिती दिल्याचे सर्वांनी अनुभवले. आता दरवर्षी हे पारायण नियमित होणार आहे. तसेच चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशतीचे पाठ व्हावेत, अशी इच्छा उपस्थित अनेक भाविकांनी व्यक्त केली. मंगळग्रह सेवा संस्थेने या इच्छेचा आदर राखत हा देखील कार्यक्रम नक्की करू, असे आश्वासन दिले.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026

Recent News

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group