
मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड(ED Raid) पडली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक सकाळी ७ च्या सुमारास संजय राऊतांच्या मुंबईतील घरी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झाले . सकाळी ७ वाजतापासून राऊत यांची चौकशी सुरु आहे. या कारवाईवरून मनसेने संजय राऊत यांना डिवचले आहे.
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “काहीही करा पण विश्वप्रवक्ते यांना रोज पत्रकार परिषद घेण्यापासून वंचित ठेवू नये ही “ED”ला नम्र विनंती… (आत ठेवा नाहीतर बाहेर पण त्यांना त्यासाठी विशेष परवानगी द्या) नाहीतर हा महाराष्ट्र एका मोठ्या अभिनेत्याच्या अभिनयाला मुकेल” असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.





















