• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 25, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५  मार्च २०२६

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करत तपासाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. “कोणाचाही फोटो किंवा संबंध यावरून गुन्हा सिद्ध होत नाही. मात्र, डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून ज्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “या प्रकरणात कोणीही पोलिसांवर दबाव आणण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनाही पाठीशी घातले जाणार नाही.” त्यांनी विरोधकांच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तपास करण्याच्या मागणीला नकार दिला.

विधानसभेत विरोधकांनी अनेक राजकारणी, आयपीएस, आयएएस अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अशोक खरातसोबतचे फोटो समोर आल्यामुळे तपासात हस्तक्षेप होण्याची भीती व्यक्त केली होती. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “राजकारणात अनेक लोकांशी संपर्क येतो. केवळ फोटोवरून कोणी आरोपी ठरत नाही.”

तपासाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, खरातच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून मुंबईतील प्रयोगशाळेत डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्याचे काम सुरू आहे. “त्याच्या मोबाईलमधून कोणाशी संपर्क झाला, कोणते संदेश पाठवले गेले याचा सविस्तर तपास केला जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणात काही धक्कादायक बाबीही समोर आल्या आहेत. तपासादरम्यान पोलिसांना काही व्हिडिओ हाती लागले असून त्यात आठ महिलांचे शोषण झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या व्हिडिओंमध्ये अशोक खरातने भोंदुगिरी आणि जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

तपासात सहकार्य करण्यासाठी सुरुवातीला साक्षीदार पुढे येण्यास घाबरत होते. मात्र पोलिसांनी सुरक्षा हमी दिल्यानंतर काही महत्त्वाचे व्हिडिओ ताब्यात मिळाले, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

या प्रकरणातील आरोपी राजेंद्र जासूद याला अटकपूर्व जामीन मिळाला असला तरी इतर आरोपींविरुद्ध तपास सुरू आहे. तसेच शिर्डी येथे एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार नीरज जाधव याने एआय-जनरेटेड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही समोर आला आहे. संबंधित फोटो नंतर डिलीट करण्यात आला असला तरी त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकूणच, भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातील तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचत असून, यामध्ये मोठ्या राजकीय आणि प्रशासकीय नावांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेमुळे या प्रकरणातील कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Posts

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!
जळगाव

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !
जळगाव

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

July 14, 2026
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!
जळगाव ग्रामीण

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !
जळगाव

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

July 14, 2026
अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !
क्राईम

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !
क्राईम

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

July 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

July 14, 2026
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

July 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group