• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 29, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ मार्च २०२६ 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेली जिल्हा बैठक उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. या बैठकीस संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील तालुका, शहर व ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान पक्ष संघटन, सभासद नोंदणी, स्थानिक प्रश्न तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना गजानन राणे यांनी सकारात्मक व स्पष्ट उत्तरे देत पुढील कामकाजाची दिशा दिली.

यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात मनसेचे संघटन तळागाळापर्यंत मजबूत करण्यावर भर देत सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात राबवावी, असे आवाहन केले. तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने इच्छुक उमेदवार व स्थानिक तयारीबाबतचे सविस्तर अहवाल तातडीने संपर्क अध्यक्षांकडे सादर करावेत, असे निर्देश दिले.

विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत मार्फत होणाऱ्या ग्रामसभांना नियमित उपस्थित राहणे अत्यावश्यक असून, गावपातळीवरील प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
दरम्यान, दि. २९ मार्च रोजी गजानन राणे हे भुसावळ, रावेर, यावल आणि चोपडा विधानसभा मतदारसंघात दौरा करून ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

बैठक संपल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी विश्रामगृहात येऊन गजानन राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीमुळे राजकीय पातळीवर सकारात्मक वातावरणाचे दर्शन घडले. या बैठकीमुळे जळगाव जिल्ह्यात मनसेच्या संघटनाला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी काळात पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक. संजय नन्नवरे, एरंडोल तालुका अध्यक्ष विशाल सोनार, जामनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील, जळगाव शहराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळले,जळगाव उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, विभाग अध्यक्ष उमेश आठरे, विशाल जाधव,शाखाध्यक्ष अशोक खाटीक, खुशाल ठाकूर, राहुल चव्हाण, ऐश्वर्या श्रीरामे, साजन पाटील, दीपक राठोड, प्रकाश झोपे, जितेंद्र पाटील, संदीप मांडोळे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष, प्रदीप पाटील, हर्षल वाणी, व इतर असंख्य पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते,

Related Posts

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group