
जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२६
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या वतीने शहरात उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शहरातील फुले मार्केट परिसरातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक कार्याची तसेच शिक्षण प्रसारातील मोलाच्या योगदानाची आठवण काढत त्यांच्या विचारांना उजाळा दिला.
महात्मा फुले यांनी समाजातील वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली करत समतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली असून, आजही त्यांच्या विचारांची प्रेरणा समाजाला मार्गदर्शक ठरत आहे, असे यावेळी वक्त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष योगेश बागडे, मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार वीर दहियेकर, तसेच सदस्य पंकज गागडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात पार पडला.





















