जळगाव मिरर | ७ ऑक्टोबर २०२६
भारतीय जनता पार्टी, जळगाव जिल्हा बाराबलुतेदार सेल महिला जिल्हाध्यक्षपदी आदरणीय पूनमताई खैरनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे आणि जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमालाताई काळे यांच्या हस्ते पूनमताई खैरनार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बाराबलुतेदार समाजातील महिला व विविध घटकांना संघटित करण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या आणि प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी पूनमताई खैरनार यांच्या माध्यमातून संघटनात्मक पातळीवर प्रभावी काम होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत समाजातील महिला भगिनींना संघटित करून भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पूनमताई खैरनार यांनी सांगितले.





















