
जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२६
एरंडोल येथील सेंट मेरी पब्लिक स्कूलमध्ये भारताचे महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापक रेवरंड सिस्टर पेप्सी, उपमुख्याध्यापक रेवरंड सिस्टर मनीषा, लोकल मॅनेजर रेवरंड सिस्टर प्रमिता तसेच शिक्षकवृंदांमध्ये शिंपी सर, हर्षद चौधरी, सत्यनारायण पवार, मनीषा लाड, शिल्पा तिवारी, मनीषा हिरे, मनीषा जैन, रीना शाह, वैशाली महाजन, बबिता पाटील, अनुराधा बडगुजर, पाटकरी आदी मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात हर्षद सर आणि पवार सर यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करून करण्यात आली. यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव करणारे विचार आणि प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. करुणा भालेराव यांनी अतिशय सुंदर व प्रभावी पद्धतीने केले. त्यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्याची माहिती सुस्पष्ट शब्दांत मांडत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व आणि मानवतेचे मूल्य यांची जाणीव झाली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





















