
जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२६
आज दिनांक 14/04/2026 वार मंगळवार रोजी श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव माजी नगरसेवक श्री अशोकभाऊ लाडवंजारी हे होते तर प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री पन्नालाल वंजारी संस्थेचे संचालक श्री वासुदेवभाऊ सानप , भगवान लाडवंजारी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिवाकर जोशी सर हे होते तर प्रमुख अतिथी श्रीराम प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ईश्वरी इखे मॅडम व विद्यालयातील शिक्षिका राजश्री तायडे मॅडम या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून झाली.
यावेळी इयत्ता 1 ली ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली यात गौरी पवार वैष्णवी सिद्धार्थ ,नंदिनी पवार ओम पवार ,भावना शेजवळ , मोहिनी शिवदे, खुशी माळी या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक ,सामाजिक भारतीय राज्यघटने मधील सहभाग याविषयी माहिती दिली यावेळी गीत सादर करण्यात आले*हे गीत आलिया पिंजारी ,कल्याणी कोचुरे ,वैष्णवी सिद्धार्थ व सहकारी विद्यार्थ्यांनी सादर केले
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजश्री तायडे मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य व शिक्षण विषयक विचार याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे सचिव माजी नगरसेवक श्री अशोकभाऊ लाडवंजारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज सुधारणा विषयी कार्य व भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग , शिका संघटित व्हा व संघर्ष करा याविषयी या विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख अमित तडवी सर,उपसांस्कृतिक प्रमुख सरस्वती पाटील मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलिया पिंजारी इयत्ता नववी हिने केले. तर आभार कल्याणी कोचुरे इयत्ता नववी हिने मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम व सहकार्य केले





















