• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 14, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे !
Share on FacebookShare on Twitter

समता सप्ताहात अभिवादन व स्वाभिमान मेळावा उत्साहात संपन्न

जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२६

“समाजातील असमानता दूर करण्यासाठी संविधानाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे,उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त चित्रकार तथा लेखक राजू बाविस्कर, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राकेश महाजन, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, सहायक आयुक्त योगेश पाटील, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, विशेष अधिकारी, अमोल कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री घुगे म्हणाले,भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, पण त्यात असमानताही आहे. ही असमानता दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा मार्गच आपल्याला तारू शकतो. युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी सोशल मीडियाच्या युगातही सखोल अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. बाबासाहेबांचे अर्थशास्त्र, कामगार कायदे तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापनेतील योगदान नमूद करत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसतीगृहाच्या अंकिता गजरे या विद्यार्थिनीने उत्कृष्ट पणे पोवाडा सादर केल्याबद्दल तीचे कौतुक करत तरुणांमधील कला व सामाजिक जाणीवेचे स्वागत केले. तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू बाविस्कर यांच्या यशाचा उल्लेख करत जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापौर दीपमाला काळे यांनी संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकांना समान संधी मिळाल्याचे नमूद करत, विकासासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे सांगितले. शेतीक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान ए.आय स्वीकारण्याचे शेतकऱ्यांना त्यांनी आवाहनही केले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नायर आपल्या मनोगत म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य प्रत्येकाने आत्मसात करावे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही चार महत्त्वाची मुल्ये आपण नेहमी लक्षात ठेवून अंगीकारली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू बाविस्कर यांनी आपल्या मनोगतात वंचित समाजाच्या वेदना, दारिद्र्य आणि सामाजिक विषमतेचे वास्तव अधोरेखित केले. आपल्या लेखन व चित्रकलेतून उपेक्षित घटकांचे जीवन मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत त्यांनी समाजाने अधिक संवेदनशील होण्याची गरज व्यक्त केली. शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्यावर भर देत, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ज्ञानाच्या मार्गावर चालण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या साहित्याला मिळालेला सन्मान हा वैयक्तिक नसून संपूर्ण समाजाचा आहे, तसेच हा गौरव जळगाव जिल्ह्याचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, “मानवी हक्काचे प्रतीक चवदार तळे सत्याग्रह” या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले, चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठीचा लढा नसून मानवी सन्मान व हक्कांसाठीचा संघर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांच्या लेखनाचा सखोल अभ्यास आवश्यक असून केवळ जयंती साजरी करून थांबणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या उदाहरणातून सामाजिक समतेचा संदेश देत ते म्हणाले, भारताची तत्त्वज्ञान परंपरा ही सर्वांना समान दर्जा देणारी असून प्रत्येकाने डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार करून समता, बंधुता व मानवी हक्कांची अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी यांनी “कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची नवी लाट” या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले, शेतीकडे उद्योजकतेच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी महाविस्तार एआय ॲपचा वापर करून शेती विषयक माहिती उपलब्ध करून द्यावी, दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेची तसेच विविध शासकीय योजनांची माहिती त्यांनी दिली. तरुणांनी शेती व उद्योग क्षेत्रात संधी शोधून उद्योजक बनावे, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त श्री पाटील यांनी समता सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली व कार्यक्रम आयोजनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, यांच्या प्रतीमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसांना शासकीय,निमशासकीय नोकरीचे नियुक्ती आदेशांचे वाटप तसेच समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे व विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. समाज कल्याण कार्यातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हर्षल पाटील यांनी केले. कार्यक्रमाला विविध पुरस्कार्थी, सबळीकरण योजनेचे लाभार्थी तसेच जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी अमोल कुलकर्णी यांनी केले.

Related Posts

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group