• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 17, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला  !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ एप्रिल २०२६ 

शहरातील एमआयडीसी परिसरात गुरुवारी सकाळी एका तरुणाने तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, परिसरातील कंपनीत कार्यरत असलेल्या मजुरांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार उघडकीस आला आणि संभाव्य अनर्थ टळला. पोलिस तपासात हा प्रकार प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या वादातून घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुण चारचाकी वाहनाने एमआयडीसी परिसरात आला. रस्त्याने जात असलेल्या एका तरुणीला त्याने अडवून तिला जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. या वेळी तरुणीने प्रतिकार केल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा प्रकार पाहताच जवळील एका कंपनीतील मजूर तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी संबंधित वाहन अडवून तरुणाला जाब विचारला. सुरुवातीला तरुणाने “ही माझी पत्नी आहे” असे सांगून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मजुरांनी तरुणीकडे विचारणा केली असता ती घाबरून रडू लागली. तिच्या हातावर जखमांच्या खुणा दिसून आल्याने उपस्थितांचा संशय अधिकच बळावला.

त्यानंतर मजुरांनी तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. चौकशीत दोघे पती-पत्नी नसून त्यांच्या मध्ये प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. काही कारणावरून झालेल्या वादाच्या रागातून तरुणाने हा अविचारी प्रकार केल्याची कबुली दिली.

या प्रकरणात विशेष म्हणजे, तरुणी किंवा तरुण या दोघांनीही एकमेकांविरुद्ध कोणतीही लेखी तक्रार देण्यास नकार दिला. तरीही, सार्वजनिक ठिकाणी कायदा हातात घेतल्याप्रकरणी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत दोघांनाही समज देत नोटीस बजावली आहे.

दरम्यान, बुधवारी जिल्हा उद्योग केंद्राजवळील महाविद्यालयासमोरही अशाच प्रकारची एक घटना घडली होती. कारमधून आलेल्या तरुणाने तरुणीला पळवून नेल्याने परिसरात अपहरणाची चर्चा रंगली होती. मुलीला अडवण्याच्या प्रयत्नात तिची आई काही अंतर कारसोबत फरफटत गेल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिस तपासात संबंधित तरुण-तरुणीने कायदेशीर विवाह केल्याचे स्पष्ट झाले. दोघेही संरक्षणासाठी पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर या नाट्यमय प्रकरणाचा शेवट झाला. या सलग घटनांमुळे शहरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !
क्राईम

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026
भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार
क्राईम

भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार

June 23, 2026
पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
क्राईम

पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

June 23, 2026
शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !
जळगाव

शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

June 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group