• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 18, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ एप्रिल २०२६ 

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरगाव परिसरात शुक्रवारी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे वरणगावसह दर्यापूर शिवार परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात श्याम विक्रम ठाकूर (४५), शोभा विक्रम ठाकूर (६०) आणि अवघ्या ५ वर्षीय शिवन्या श्याम ठाकूर यांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूर कुटुंबीय उज्जैन, ओंकारेश्वर आणि सिहोर येथे धार्मिक दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते आपल्या मूळ गावी परत येत असताना हा अपघात घडला. पहाटेच्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन विविध रुग्णालयांत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. अपघातात कारचालक श्याम ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शोभा ठाकूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लहानगी शिवन्या हिला बऱ्हाणपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचार सुरू असतानाच तिचाही मृत्यू झाला. या अपघातात चार भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सलग घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दर्यापूर शिवारातील गणेश नगर आणि वरणगाव फॅक्टरी परिसरात या घटनेची माहिती पोहोचताच शोककळा पसरली. ठाकूर कुटुंबाच्या घरी नातेवाईक आणि शेजाऱ्यांची मोठी गर्दी झाली असून आक्रोशाचे दृश्य पाहायला मिळत आहे. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Posts

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !
क्राईम

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026
भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार
क्राईम

भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार

June 23, 2026
पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
क्राईम

पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group