
जळगाव मिरर | २० एप्रिल २०२६
पाचोरा शहरातील एका कॉलनी भागात १७ वर्षीय मुलगी त्यांचे घरी झोपलेली असताना एक इसम अनाधिकृतपणे घरात शिरुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. त्या मद्यपी इसमास शेजारच्यांच्या मदतीने पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन करुन त्याचे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील एका भागात १८ एप्रिल रोजी रात्री एक १७वर्षीय अल्पवयीन मुलगी त्यांच्या घरात झोपलेली असताना एक २५ ते ३० वर्षीय इसमाने घरात घुसून झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंगकरुन अश्लीलचाळे करत होता. सदर प्रकार मुलीच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केल्याने शेजारी जमा झाले.
घटनास्थळावरून त्या इसमाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजारील महिला व काही पुरुषांनी त्यास ताब्यात घेत ११२ क्रमांकावर कॉल करुन सदर इसमास पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेवरून एका विरुद्ध पिडित मुलीच्या आईच्या फिर्यादिवरुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पो. नि. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. योगेश गणगे हे करीत आहेत.





















