• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 20, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | 20 एप्रिल 2026 

बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली असून, आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. केज तालुक्यातील एका गावात सावत्र आई आपल्या सावत्र मुलासोबत फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीला दोन मुले व दोन मुली असून दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. कौटुंबिक वादामुळे त्याची पहिली पत्नी मागील १५ वर्षांपासून माहेरी राहत आहे. त्यामुळे चार वर्षांपूर्वी त्या व्यक्तीने एका परित्यक्त्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असताना कालांतराने या महिलेचे आपल्या सावत्र मुलाशी अनैतिक संबंध जुळल्याचे समोर आले. एकाच घरात राहत असताना दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. या संबंधाची कुणकुण गावकऱ्यांनाही लागली होती. दरम्यान, महिलेचा पती १२ एप्रिल रोजी देवदर्शनासाठी मुंबईला गेला असताना ही संधी साधून संबंधित महिला आपल्या सावत्र मुलासोबत घरातून पसार झाली. पती परत आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यानंतर त्याने तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर करत आहेत.

दरम्यान, फरार झालेली महिला आणि तिचा सावत्र मुलगा तेलंगणात गेल्याचा संशय आहे. ते ज्या दुचाकीवरून (एमएच 13 बीयू 1587) गेले, ती दुचाकी महिलेच्या जावयाची असल्याचे समोर आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी ही दुचाकी पकडून दंड ठोठावल्याचा संदेश १६ एप्रिल रोजी जावयाच्या मोबाईलवर आला. यामुळे दोघेही तेलंगणात असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून परिसरातही चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातच आणखी एक गंभीर घटना घडली आहे. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा गोवर्धन गावचे माजी सरपंच संजय देशमुख यांच्यावर रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. देशमुख हे गोवर्धनहून सिरसाळ्याकडे जात असताना दोन दुचाकींवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून परळी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Related Posts

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !
राज्य

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group