
जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२६
रोटरी कॅलेंडरनुसार असलेल्या पर्यावरण महिन्यानिमित्त ‘पर्यावरण संवर्धन अभियान’ जळगाव रोटरी क्लब ऑफ ग्रीनसीटीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.रिंग रोड येथील वेव्ज क्लासेस मध्ये पहिल्या टप्प्यात पोस्टर अनावरण व शपथ घेवून आ.राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमास सुरुवात झाली.
जनजागृती,अंमलबाजवणी
आणि पाठपुरावा अशा तीन टप्प्यात अभियान राबविले जाईल ही माहिती क्लबचे सचिव ऍड.अभय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिली व पोस्टरमध्ये असलेल्या नियमांचे पुनर्वाचन करून पर्यावण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. या वेळी क्लबच्या अध्यक्षा धनश्री ठाकरे,खजिनदार डॉ.भावना चौधरी,प्रा.ए.टी.चौधरी,क्लबचे सदस्य समीर रोकडे,अर्चना माळी,डॉ.पूजा वाघ,प्रवीण सपकाळे,विकास निकम,अभिजित चौधरी यांनी पोस्टरचे अनावरण केले व विद्यार्थ्यांना जनजागृतीचे धडे सांगत वाटप करण्यात आले.नागरिकांच्या सहभागाने ग्रीनसिटी कडून या अभियानांतर्गत जळगाव शहर नक्कीच ग्रीन होईल असे मनोगत आ.राजूमामा यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित पाटील तर आभार डॉ.भावना चौधरी यांनी केले.






















