• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रिंगरोड भूसंपादनाला हिंसक वळण; महिलांना घरात घुसून मारहाणीचे आरोप, नाशिकमध्ये संतापाची लाट

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 6, 2026
in क्राईम, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
रिंगरोड भूसंपादनाला हिंसक वळण; महिलांना घरात घुसून मारहाणीचे आरोप, नाशिकमध्ये संतापाची लाट
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ मे २०२६ 

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या बाह्य परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रोड प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला आता हिंसक वळण लागल्याचे समोर आले आहे. मातोरी आणि मुंगसरे परिसरात जमीन मोजणीदरम्यान पोलिस व प्रशासनाकडून शेतकरी आणि महिलांना घरात घुसून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे ६६ किलोमीटरचा रिंग रोड विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी दरी, मातोरी, मुंगसरे, मखमलाबादसह अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. मात्र या भूसंपादनाविरोधात अनेक शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

असे असतानाही शुक्रवारी रात्री उशिरा ग्रामस्थांना व्हॉट्सॲपवर मोजणीच्या नोटिसा पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता मोजणी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी जी. व्ही. एस. पवनदत्ता, तहसीलदार आणि मोठा पोलिस बंदोबस्त सकाळी सात वाजताच मुंगसरे गावात दाखल झाला.

यावेळी मोजणीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना आणि महिलांना पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. काही महिलांनी रडत आपली व्यथा मांडली असून प्रशासनाने दबाव टाकत कारवाई केल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले असून ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना प्रशासनाने एवढ्या घाईत आणि पहाटेच्या सुमारास मोजणी का केली?” असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या घटनेनंतर रिंग रोड प्रकल्पाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सत्तेच्या माजात सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. ही मस्ती सरकारला महागात पडेल,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.  या प्रकरणाची गंभीर दखल घेत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. नाशिक रिंग रोडच्या मोजणीवेळी काही अनुचित प्रकार घडला असेल तर त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्रशासनाच्या कारवाईविरोधात ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त होत असून येत्या काही दिवसांत हे आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Posts

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय
राज्य

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !
जळगाव

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026
जळगावात पोलीस स्टेशनला नेल्याने तरुणांनी केली पोलिसाला मारहाण !
क्राईम

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा राडा; पोलीस रक्षकावर हल्ला

June 9, 2026
बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !
क्राईम

बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !

June 9, 2026
मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित शेवट; पाचोर्‍यात ४४ वर्षीय व्यक्तीची हत्या
क्राईम

मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित शेवट; पाचोर्‍यात ४४ वर्षीय व्यक्तीची हत्या

June 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026
जळगावात पोलीस स्टेशनला नेल्याने तरुणांनी केली पोलिसाला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा राडा; पोलीस रक्षकावर हल्ला

June 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group