
यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील बामणोद येथे दारूच्या नशेत एकाला मारहाण करून शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, येथील इंदिरा नगरात सुनिल पंडीत तायडे (वय-४९) हे आपल्या परिवारासह राहायला आहे. बुधवार ३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता सुनिल हा त्याचा मित्र नरेंद्र छोटू लोहार याच्यासोबत गप्पा मारत असतांना गावातील सागर मुरलीधर सोनवणे याने दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करून धारदार वस्तूने वार करून जखमी केले. याबाबत सुनिल तायडे याने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी फैजपूर पोलीस ठाण्यात सागर सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेश वंजारी करीत आहे.





















