
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात काही ठिकाणी स्पा सेंटर मोठ्या प्रमाणावर काही स्पा सेंटर हे नियमानुसार सुरु आहे तर काही ठिकाणी नको ते उद्योग सुरु आहे. पुण्यामधील साळुंके विहार परिसरात एका स्पा सेंटरवर धाड टाकण्यात आली. त्यात स्पा-सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे उघडकीस आले. मसाज सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली असून ४ तरुणींची सुटका यावेळी करण्यात आली आहे. यात एक छत्तीसगड, एक पश्चिम बंगाल व दोन महाराष्ट्रातील तरुणी आहेत.
दरम्यान याप्रकरणी स्पा मॅनेजर झरणा ऊर्फ पिंकी गौतम मंडल (२७, रा.कोंढवा, पुणे, मु.रा. पश्चिम बंगाल), सुमीत अनिल होनखंडे (२१, रा. कोंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. स्पा मालक रचना संतोष साळुंखे (रा. येवलेवाडी, पुणे), सार्थक लोचन गिरमे (रा. वानवडी, पुणे) व लोचन अनंता गिरमे (रा.पुणे) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.




















