
निंभोरा बु. ता.रावेर
नुकत्याच झालेल्या डीप्लोमा फार्मसी अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये फैजपूर येथील इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीच्या विदयार्थ्यांना सुयश मिळाले. त्यामध्ये
प्रथम क्रमांक- दिपेश सुनील सोनावणे ,निंभोरा (77.40%), द्वितीय क्रमांक – खिलेश्वरी जितेंद्र पाटील, चिनावलं (75.10%), तृतीय – वैभव नरेंद्र नाथजोगी, फैजपूर (73.20%), चतुर्थ क्रमांक – केतन भास्करराव नेमाडे,चिनावलं (69.70%), यशस्वी मुलांचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे .
संस्थेचे प्राचार्य डॉ.आर.एल.चौधरी, दिलीप पाटील, आशिष पाटील,अर्चना भंगाळे, पायल झोपे, एकता कोल्हे, जागृती चौधरी यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते.






















