
शेंदुर्णी ता.जामनेर :प्रतिनिधी
महाराष्ट्रातील संत मुक्ताबाईची सर्वात जुनी पालखी असलेल्या जळगाव येथील श्रीराम मंदिर संस्थान संचलित ,गादीवारस ह.भ.प.मंगेश महाराज जोशी हे पालखी सोहळ्याचे प्रमुख असलेल्या श्री. संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्याचे समस्त शेंदुर्णी नगरी च्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले.
१४ जुन २०२२ रोजी जळगाव येथुन निघालेली ही दिंडी पालखी २६ दिवसांनी क्षेत्र पंढरपुर येथे पोहचली तिथे चार दिवस मुक्काम केल्यानंतर दि.१३ जुलै.रोजी पंढरपुर येथुन निघुन पुन्हा २६ दिवसांचा पायी प्रवास करत दि.७ आँगस्ट२०२२ रोजी जळगाव येणार आहे. गुरुवारी या पालखीचे स्वागत करण्यात आले. दीडशे वर्षांची परंपरा आहे. संध्याकाळी श्री. त्रिविक्रमाच्या मंदिर हरीपाठ,भजन कीर्तन ह.भ.प.मंगेश महाराज यांनी वारकरी व ग्रामस्थांच्या उपस्थित मध्ये केले. तब्बल ५२ दिवस या पालखी मिरवणुकीत भाविक पायी वारी करत असतात. या पालखीच्या माध्यमातुन समाजप्रबोधन करण्यात येत असते. स्वच्छता अभियान या दिंडीचे वतीने गावोगावी स्वछता अभियान राबविण्यात आले. सगळ्यात उशिरा आपल्या मुळ ठिकाणी पोहचणारी ही पालखी मिरवणुक आहे.






















