
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील महेश प्रगती सभागृहात महिलांसाठी ‘तिज सिंजारा’ हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ हि घेण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, माहेश्वरी सखी महिला मंडळाचा ‘तिज सिंजारा’ हा कार्यक्रम मोठ्या थाटात महेश प्रगती हॉल येथे उत्साहात झाला. शहरातील बालाजी पेठ, भवानी पेठ, बळीराम पेठ, नवी पेठ यांचाही प्रोजेक्ट उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले मिमिक्री डान्स गाणे इन्स्टारील्स कॉम्पिटिशन इत्यादी प्रकारच्या खेळांमध्ये प्रिन्स कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक महेश मार्ग व द्वितीय क्रमांक रिंग रोड परिसर यांना मिळाला.कार्यक्रमाला रिद्धी जान्हवी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चित्रलेखा मालपाणी, मनीषा मणियार, पल्लवी लढ्ढा, अरुणा नवाल,रंजना लढ्ढा, सारिका मंडोरा,सविता दुप्पट,शारदा दुप्पट, दुप्पड ,ज्योती जेथेले, सीमा नवाल, चित्रा मालपाणी, सुरेखा झंवर,यांची प्रमुख उपस्थिती होती.






















