जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२६
मेहरूण तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी व स्थायी समिती सभापती ड्रा चंद्रशेखर पाटील तसेच प्रभाग 13 मधील नगरसेवक नितीनभाऊ सपके, नगरसेविका वैशालीताई पाटील, नगरसेवक अमरकाका जैन, नगरसेवक ड्रा राधेशाम चौधरी याचा उपस्थिती मध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. मेहरूण तलावात शहरातील गटारीचे सांडपाणी जाऊ नये, यासाठी ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मेहरून तलावामध्ये एक दोन नव्हे तबल 16 ड्रेनेज चे सांड पाणी सोडण्यात आले हें या साठी कायम स्वरूपी ठोस उपाय योजना करा आणि गणपती विसर्जन पूर्वी दोन पम्प हाऊस तात्काळ सुरु करण्या च्या सूचना सुद्धा दिल्या यावेळी संबंधित ठेकेदाराने गटारीचे पाणी तलावात जाणार नाही, यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची ब्ल्यू प्रिंट सादर करून संपूर्ण नियोजनाची माहिती दिली. सांडपाण्याचा प्रवाह अडविणे, आवश्यक ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणे तसेच तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली.
मेहरूण तलाव हा जळगाव शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत असून, तलावात गटारीचे पाणी जाणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उपमहापौर मनोज सुरेश चौधरी व सभापती तसेच सर्व नगरसेवक यांनी कठोर शब्दात बैठकीत नाराजी व्यक्त केली.
तलावात सांडपाणी जाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठेकेदाराने विलंब न करता तातडीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे स्पष्ट आदेश उपमहापौरांनी दिले. तसेच कामाची गुणवत्ता, नियोजनानुसार अंमलबजावणी आणि वेळेत काम पूर्ण होते की नाही, यावर महापालिका प्रशासनाने काटेकोर लक्ष ठेवावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
“मेहरूण तलावाचे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे कागदोपत्री उपाययोजना न करता प्रत्यक्षात परिणाम दिसला पाहिजे. गटारीचे पाणी तलावात जाणार नाही, याची ठोस व्यवस्था तातडीने झाली पाहिजे या साठी आयुक्त साहेब याचा शी ही चर्चा करूअसे उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी सांगितले. तलावाचे प्रदूषण रोखून मेहरूण तलाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.





















