
सातारा : वृत्तसंस्था
कौटुंबिक वादातून काकाने आपल्या सख्ख्या दहा महिन्यांच्या पुतण्याला विहिरीत टाकल्याने त्याचा मृत्यू झाला. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना सातारा एमआयडीसी परिसरातील कोडोली-दत्तनगरमध्ये घडली. या घटनेत शलमोन मयूर सोनवणे या बाळाचा मृत्यू झाला असून संशयित चुलता अक्षय मारूती सोनवणे यास सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सातारा एमआयडीसी परिसरातील दत्तनगरमध्ये सकाळी हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. आईवडील आपल्याला त्रास देतात, म्हणून संशयित अक्षय सोनवणे याने भावाच्या मुलाला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाहेर आणले. परिसरातील एका विहिरीजवळ आल्यानंतर त्याला विहिरीत टाकले. त्यात बाळाचा मृत्यू झाला असल्याची माहिती सातारा शहर पोलिस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी दिली आहे.




















