• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 1, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२६ 

शहरातील शाहूनगर परिसरातील शाहू कॉम्प्लेक्स येथे पॅन्टच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा जळगाव शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत छडा लावला. सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली असून, एका विधी संघर्षित बालकास कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून १२ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते ४.३० वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. फिर्यादी अनिल राजमल कासट (वय ६२, रा. एम.आय.डी.सी., म्हाडा कॉलनी, जळगाव) हे शाहूनगर येथील शाहू कॉम्प्लेक्समध्ये असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १२ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी कासट यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक ३३५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना तातडीने तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या तसेच चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिंपी यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले.

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरीमध्ये शहीदखान नजीरखान (वय २७, रा. युसूफ मेडिकलजवळ, गेंदालाल मिल, जळगाव), समीर खान मजीदखान (वय ३७, रा. गेंदालाल मिल, जळगाव) आणि एका विधी संघर्षित बालकाचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. संशयित आरोपी गेंदालाल मिल परिसरातील एका दुकानाजवळ असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तेथे धाव घेतली. यावेळी तिन्ही संशयित पोलिसांच्या हाती लागले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत गुन्ह्यातील सहभाग नाकारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण आणि सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोन्ही प्रौढ आरोपींना अटक करण्यात आली असून, विधी संघर्षित बालकास कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून १२ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासांत आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्यात जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले. या कारवाईमुळे शहरातील चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची तपास यंत्रणा किती तत्परतेने काम करत आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.  या कारवाईत GPSI सुनील पाटील, सफौ दीपक शिरसाट, पोहेकॉ नंदलाल पाटील, भगवान पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, वीरेंद्र शिंदे, योगेश पाटील, पोकों अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार आणि भगवान मोरे यांच्या पथकाने सहभाग घेतला.

Related Posts

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

मीरा भाईंदर पोलिसांचा जळगावात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.९ किलो एमडी जप्त, स्थानिक पोलिसांचे खबरी कुठे ?

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group