
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे पहिला राष्ट्रीय भाला दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कृषी अधिकारी पांडुरंग खडके, राष्ट्रीय खेळाडू किशोर कोल्हे, राष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू महसूल विभागाचे अधिकारी अनिल पठाडे, राष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू भुसावळ रेल्वे विभागाचे टी. सी. सतीश चौधरी, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.पी.आर.चौधरी, उपाध्यक्ष हाजी ईकबाल मिर्झा, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे यांची उपस्थिती होती प्रारंभी भाल्याचे पूजन करण्यात आले.
आजच्या दिनाचे महत्व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी विशद केले याप्रसंगी जिल्ह्यातील राज्यस्तरीय भालाफेक खेळाडू रोहित महाजन, ओम सोनवणे, मोरेश्वर वाणी, राज चव्हाण, चंदन महाजन, अजय देवरे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी जिल्हा ॲथलेटिक्स परिवाराचे संतोष पवार, निलेश पाटील, सचिन महाजन, योगेश सोनवणे, प्रा.समीर घोडेस्वार, विजय विसपुते, नितीन पाटील व खेळाडूंची उपस्थिती होती राष्ट्रीय भाला दिनानिमित्त आज जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनला संलग्नित पारोळा, भडगाव, एरंडोल, चाळीसगाव, जामनेर, भुसावळ, मुक्ताईनगर, अमळनेर, धरणगाव, रावेर, जळगाव, चोपडा तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे भव्य प्रमाणात भालाफेक स्पर्धा घेण्यात आल्या.




















