
जळगाव : प्रतिनिधी
राज्यात दोघांचा कारभर सुरु आहे एक मुख्यमंत्री तर दुसरा बिन खात्याचा उपमुख्यमंत्री तर राज्यात अजून पूर्ण मंत्रिमंडळ नाही. शिंदे सरकार अस्तित्वात नाही. ३७ दिवस झाले सरकारचा पोरखेडपणा सुरू आहे, साऱ्या फायलींचा मुख्यमंत्र्यांकडे ढिग लागतोय. अशी घणाघाती टीका माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारवर केली.
खडसे पुढे म्हणाले की, शिंदे सरकारचं अजून मंत्रिमंडळ नाही. दोघांचा कारभार सुरू आहे. एक मुख्यमंत्री आहे तर दुसरा बिनखात्याचा उपमुख्यमंत्री आहे. त्यांच्याकडे एकही खाते नाही. साऱ्या फायलींचा मुख्यमंत्र्यांकडे ढिग लागतोय. शिंदे सरकारचे अडीच वर्षे बाकी आहेत. मला असं वाटत नाही की, सरकार अडीच वर्ष टिकेल. एक वर्षात निवडणुका लागल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. निर्णय घ्यायला या राज्यात कोणी नाही. राज्यातील जनता हवालदिल आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या पक्ष मेळाव्याप्रसंगी मुक्ताईनगरमध्ये बोलत होते.
राज्यातील विकासकामे रखडली
मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात अद्याप मंत्रिमंडळ तयार झालं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचाच कारभार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडं फायलींचा ढिग असतो. उपमुख्यमंत्री तर बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळं राज्यातील विकासकामे रखडली असल्याचा आरोप खडसे यांनी केला.
सरकारवर जोरदार हल्लाबोल
राज्यात शिंदे सरकारकडं अडीच वर्षांचा वेळ बाकी आहे. परंतु, अजून इतर मंत्र्यांनी शपथ घेतली नाही. एक महिना ओलांडला, तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. हे सरकार अडीच वर्षे चालेल, असं वाटत नसल्याचं खडसे म्हणाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या राज्यात निर्णय घेणार फक्त एकच व्यक्ती आहे. त्यामुळं एकूण किती दिवस हे सरकार टिकेल, काही सांगता येत नाही. या सरकारचा काही भरोसा नाही, असंही खडसे म्हणाले. एकंदरित कार्यकर्त्यांना तयारीला लागा, असाच काहीसा संदेश एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला.




















