जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२६
चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथील रहिवासी असलेल्या राज दीपक धनगर (वय २३) या सीआरपीएफ जवानावर पूर्व वैमानास्यातून दोन जणांनी चाकूने हल्ला केला. यात राज धनगर हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफमधील जवान राज दीपक धनगर हे २१ रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास अकुलखेडा येथील बस स्टॅन्ड परिसरात गेले होते. या वेळी त्यांच्यावर अकुलखेडा येथील दोघा अज्ञातांनी चाकूने हल्ला केला. यात राज दीपक धनगर हे जवान गंभीर जखमी झाले. आहेत. त्यांना तत्काळ चोपडा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तत्काळ जळगाव येथे हलवण्यात आले आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तर, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी जखमी जवान राज धनगर ज्या शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाले, तेथे जावून भेट दिली.




















