जळगाव मिरर | २१ सप्टेंबर २०२६
पिंप्राळा परिसरातील सावखेडा रोडजवळील सोनी नगर येथे सोनी नगरचा विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने पार्श्व नेत्रालय, जळगाव आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून रविवार, दि. २० आणि 21 सप्टेंबर रोजी दोन दिवशीय मोफत विशेष डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे 100 गणेश भक्तांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली.

यावेळी रुपेश वाघ यांनी जपानी कॉम्प्युटर मशिनद्वारे डोळ्यांची तपासणी केली. तसेच डोकेदुखी, डोळे लाल होणे, डोळ्यांत जळजळ किंवा चुरचुर होणे, बारीक अक्षरे अथवा सुईच्या नाकासारख्या बारीक वस्तू कमी दिसणे, जवळचे किंवा दूरचे कमी दिसणे आदी डोळ्यांशी संबंधित समस्या असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार डोळ्यांत टाकण्यासाठी ड्रॉप्सही देण्यात आले.
यावेळी गणेश राणे, अनिल पवार, महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे सागर नारखेडे, सरदार राजपूत, यशवंत पाटील, मधुकर ठाकरे, विनोद निकम, नरेश बागडे, गजानन पाटील, निलेश जोशी आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी केतन पाटील, उमेश येवले, ओंकार जोशी, लाभेश पाटील, कैलास साळवे, पीयुष पाटील आदींनी परिश्रम घेतले.




















