
नंदुरबार : खान्देशातील एका महिला खासदार यांच्या गाडीचा अपघात झाला असून त्या खासदार यांना किरकोळ दुखापत झाली असून आता मात्र त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार येथे आदिवासी विश्व दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित मोटारसायकल रॅलीस हिरवी झेंडी दाखवण्यासाठी जात असताना खासदार डॉ.हीना गावित यांच्या गाडीला अपघात होऊन त्यांच्या नाकाला किरकोळ जखम झाली. रविवारी दुपारी एकला अॅन्टीकरप्शन कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर ही अपघात झाला. गाडीसमोर अचानक वयाेवृद्धांची स्कूटी आल्याने त्यांना वाचवताना गाडी गटार व दुभाजकावर गाडी आदळून हा अपघात घडला. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या अपघातात गाडीत बसलेल्या महेंद्र पाटील यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले अाहे. दरम्यान या वाहनात त्यांच्यासह ५ जण हाेते. अनिल गावीत गाडी चालवत होते.




















