जळगाव मिरर | ५ ऑक्टोंबर २०२६
आजोबांच्या वर्ष श्राद्धसाठी बहिणीला घेण्यासाठी जळगावला येणाऱ्या ललित मनोहर झवर (वय ३०, मूळ रा. पाळधी, ता. धरणगाव, ह.मु. प्रेमनगर, जळगाव) या तरुणाच्या दुचाकीला समोरुन भरधाव कंटेनरने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पाळधी ते तरसोद बायपासवर टाकळी फाट्याजवळ घडली. एकुतल्या एक मुलाचा मृत्युमुळे झंवर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील प्रेम नगरात राहणारे विमा एजेंट ललित झवर यांच्या आजोवांचे दि. ५ ऑक्टोबर रोजी वर्ष बद्ध असल्यामुळे सर्व जण पाळधी येथे मूळ गावी गेलेले होते. वर्ष श्राद्धसाठी ललित यांची बहीण येणार असल्याने तिला घेण्यासाठी ललित झंवर हे दुचाकीने जळगाव रेल्वे स्थानकावर येण्यासाठी निघाले. पाळधी येथून चायपासवरून येत असताना टाकळी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर फेकले गेले. त्यांना नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच झंवर यांचे नातेवाईक व मित्र परिवाराने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी मयत ललित झंवर यांचा मृतदेश बघताच एकच आक्रोश केला, त्यानंतर आमदार राजूमामा भोळे व माजी जि. प. सदस्य प्रताप पाटील यांनी देखील जिल्हा रुग्णालयात भाव घेत कुटुंचियांचे सांत्वन केले. पहिल्याच पावसात महामार्गावरील उड्डाणपुलाचा भराव खचल्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे बायपासवरुन एकेरी वाहतुक सुरु असल्याने याठिकाणी अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. दररोज लहान मोठे अपघात होवून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान महामार्ग दुरुस्तीच्या कामाला आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने हा बायपास महामार्ग अजून किती जणांचे बळी घेणार असा सवाल संतप्त जळगावकरांकडून उपस्थित केला जात आहे. झवर कुटुंबियांमध्ये ललित झंवर है एकुलत एक असल्याने त्यांच्यावर दुर्देवी काळाने झडप घातली. त्यांच्या अपघाती निधनामुळे कुटुंबियांवर दुःखावा डोंगर कोसळला असून त्यांच्या कुटुंबाचा आधार हरवला आहे. एकुलत्या एक मुलाच्या अकाली जाण्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा चक्का बसला आहे.




















