• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 30, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२६

शहरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये अस्वच्छता, तुटलेल्या गटारी, बंद पथदिवे आणि असुरक्षित विहिरी अशा विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्यांकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष जमील शेख यांच्या नेतृत्वाखाली ब्लॉक अध्यक्ष राहुल (धर्मकांत) सिद्धार्थ भालेराव यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.

प्रभाग क्रमांक १५ मध्ये दोन अत्यंत जुन्या आणि पडिक विहिरी असून, त्या परिसरात आतापर्यंत २० ते २५ जणांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या विहिरींमध्ये साचलेला गाळ काढून त्यांची स्वच्छता करावी, तसेच विहिरींना संरक्षक भिंत बांधून वरून लोखंडी जाळी बसवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परिसरात लहान मुले खेळतात. तसेच दर शनिवारी आठवडे बाजार भरत असल्याने भाजी विक्रेते आणि ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे विहिरींमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे.

स्वच्छतेचा बोजवारा, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

प्रभागातील स्वच्छता कर्मचारी आणि ठेकेदारामार्फत नियुक्त कर्मचारी नियमितपणे कामावर येत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. गटारींची सफाई आणि रस्त्यांची झाडलोट केल्यानंतर काढलेली घाण जागेवरच पडून राहते. कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टरही नियमित येत नसल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. उघड्या व तुटलेल्या गटारींमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढल्याचे निवेदनात म्हटले आहे.

१० ते १२ डेंग्यू रुग्ण आढळल्याचा दावा

प्रभागात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, १० ते १२ डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने मच्छर प्रतिबंधक औषधांची फवारणी आणि धुरळणी करावी. तसेच डेंग्यू व मलेरिया तपासणीसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

बंद पथदिव्यांचा प्रश्नही ऐरणीवर

प्रभागातील अनेक पथदिवे वारंवार तक्रारी करूनही सुरू करण्यात आलेले नाहीत. याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. शहरातील तसेच प्रभाग क्रमांक १५ मधील बंद पथदिवे तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पंचमुखी हनुमान मंदिर ते उर्दू शाळा, काळीबावळी विहीर, दत्त मंदिर, शनिवार बाजार ग्राऊंड परिसर तसेच नेरी नाका ते कासमवाडी चौकापर्यंत असलेल्या अस्वच्छतेची छायाचित्रेही निवेदनासोबत जोडण्यात आली आहेत.

महानगरपालिकेचा नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने प्रशासनाने या सर्व समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राहुल भालेराव यांनी केली आहे.

या निवेदनावर अनंत परिहार, विशाल पवार, सखाराम मोरे, अरुणाताई पाटील, अनीता कोळी, देवीदास ठाकरे, विजय वाणी, विनोद झोपे, चंद्रकांत पाटील, नाना भोई आणि हेमंत खाचणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Posts

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !
जळगाव

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!
क्राईम

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

भुसावळच्या शिक्षक पतपेढीत १.९३ कोटींचा कथित घोटाळा; ९८ सभासदांच्या नावाने बनावट कर्जप्रकरणे!

October 30, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

अल्पवयीन मुलीला धमकावून अत्याचार; सहा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा!

October 30, 2026
आ.राजूमामा भोळे यांच्या सहकार्याला यशाची जोड; जळगावचे पैलवान आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज!
जळगाव

आ.राजूमामा भोळे यांच्या सहकार्याला यशाची जोड; जळगावचे पैलवान आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज!

October 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group