जळगाव मिरर | १० नोव्हेंबर २०२६
दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त सामाजिक सलोखा, मैत्री आणि आपुलकीची भावना जपत शिवसैनिक जितेंद्र गवळी, सागर गवळी आणि समस्त मित्रपरिवाराच्या वतीने दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला मित्रपरिवारातील सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दिवाळी हा आनंद, उत्साह आणि स्नेहाचा सण आहे. या सणाचा गोडवा केवळ आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता मित्रपरिवारातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा, या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मित्रपरिवारातील सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत प्रेमाने फराळाचे वाटप करण्यात आले.
सणासुदीच्या काळात एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे, नात्यांमधील आपुलकी अधिक दृढ करणे आणि सामाजिक एकोपा जपणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. अशा उपक्रमांमुळे मित्रत्वाची भावना अधिक घट्ट होण्यासोबतच सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडते.
या कार्यक्रमाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र सचिव जितेंद्र गवळी, सागर गवळी, भूषण सोनवणे, विशाल निकम, विजय गवळी, दीपक पाटील, शुभम गवळी, श्रीराम सुतार यांच्यासह मित्रपरिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिक जितेंद्र गवळी, सागर गवळी आणि समस्त मित्रपरिवाराच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दिवाळीच्या आनंदात स्नेह आणि आपुलकीचा गोडवा अधिकच वाढला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.





















