
पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील लासगाव येथील एका २८ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात अार्थिक विवंचनेतून गळफास घेऊन अात्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे
सविस्तर असे की, येथील रहिवासी गौतम विरभान लोखंडे (वय २८) याने ९ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन अात्महत्या केली. पत्नी जळगाव येथे माहेरी तर आई व वडील हातमजुरीला गेलेले असताना घरात कोणीही नव्हते. त्यावेळी गौतम याने हे अात्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.




















