सावदा : प्रतिनिधी
पालहुन फैजपूर येथे जाणाऱ्या अॅपे रिक्षा (क्र.एमएच १९ सीडब्ल्यू ०९८०) उलटून नाल्यात कोसळल्याने १ ठार तर एक जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

सविस्तर वृत्त असे की, खिरोदा-पाल रस्त्यावर पालकडून खिरोदामार्गे फैजपूर येथे जाणारी अॅपे रिक्षा (क्र.एमएच १९ सीडब्ल्यू ०९८०) उलटून नाल्यात काेसळल्याने एक ठार व एक जण गंभीर जखमी झाला. विकास लक्ष्मण कपले रा. फैजपूर असे ठार झालेल्याचे नाव अाहे. ९ रोजी सायंकाळी ७ वाजता खिरोद्याजवळील भिलट बाबा मंदिराच्या पुढे नाल्याजवळ ही दुर्घटना घडली. येथील पाेलिसांना दुर्घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी रवाना झाले. जखमीला तातडीने भुसावळ येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. या अपघातात मनोहर मधुकर मंडवाले, रा. फैजपूर हा गंभीर जखमी झाला आहे. जेसीबीच्या सहाय्याने अॅपेरिक्षा बाहेर काढण्यात आली. यावेळी पोहेकॉ जयराम खोडपे, युसूफ तडवी, मेहेरबान तडवी, संजय तडवी, देवेंद्र पाटील यांनी तातडीने मदत केली.




















