
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील गेंदालाल मिल परिसरात असलेल्या मेडिकल दुकानदाराने पैसे मागितले असता त्यांना बेदम मारहाण व गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाल्याचा प्रकार ८ रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास घडला आहे. याबाबत मेडिकल दुकानदाराने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील गेंदालाल मिल परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या रामकृष्ण मेडिकल येथे बाळासाहेब लक्ष्मण पाटील (वय-४९) सोमवार ८ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता बाळासाहेब पाटील हे त्यांच्या मेडिकलवर असताना त्याठिकाणी अजिज बाबा पठाण रा जळगाव हा दारूच्या नशेत आला. त्यावेळी बाळासाहेब पाटील यांनी पैसे मागितले, दरम्यान याचा राग आल्याने अजिज पठाण याने चापटाबुक्क्यांनी मारहाण केली व झटापटीत बाळासाहेब पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी गहाळ झाले.
तसेच त्यांच्या मेडिकल दुकानातील काचा देखील फोडल्या गेल्या. यात अजिज पठाण याने मेडिकल विक्रेत्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात बाळासाहेब पाटील यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात अजिज बाबा पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.




















