
जळगाव : प्रतिनिधी
दि.११ ऑगस्ट, जळगाव येथील डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे कनिष्ठ महिला महाविद्यालया तर्फे भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी पालक व जनतेमध्ये जागृती करण्यासाठी प्रभात फेरीचे महाविद्यालयातर्फे आयोजन करण्यात आले.
प्रभात फेरीचे उदघाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.गौरी राणे व उपप्राचार्य श्रीमती -एस.बी.पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून केले.
प्रभात फेरी सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.जे.डी.मोरे यांनी केले.सदर प्रभात फेरीचे आयोजन नेहरू चौक ते स्वातंत्र्य चौक व परत महाविद्यालय असे करण्यात आले.या प्रभात फेरीत रा.से.यो., कला,वाणिज्य,विज्ञान व HSCVC च्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. प्रभातफेरी दरम्यान विद्यार्थिनींनी हर घर तिरंगा,वंदे मातरम,भारत माता की जय अशा विविध घोषणांनी परिसरातील वातावरण जोशपूर्ण केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ.गौरी राणे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी अनिल बेलसरे,शुभांगी चिरमाडे, समन्वयक-नितीन बावस्कर,के .सी. वंजारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




















