जळगाव मिरर | १५ जुलै २०२६
श्री महावीर सहकारी बँक लि., जळगावच्या उपाध्यक्षपदी स्वरूपकुमार भागचंद लुंकड निवड झाली. महावीर बॅकेचे मुख्यालय नवीपेठ येथे नुकत्याच झालेल्या बॅकेंचे अध्यक्ष दलिचंद जैन व सर्व संचालकांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड झाली.

उपाध्यक्ष निवडीनंतर स्वरूपकुमार लुंकड म्हणाले की, बँकेत संचालक म्हणून कार्यरत असताना संचालक मंडळाने दाखविलेल्या विश्वासामुळे ही जबाबदारी मिळाल्याचे सांगत, हा विश्वास सदैव सार्थ ठरेल अशा पद्धतीने कार्य करणार असल्याची ग्वाही लुंकड यांनी दिली. बँकेची प्रगती, ठेविदार, सभासदांचे हित आणि संस्थेची परंपरा जपण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार ही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संचालक मंडळातील सुभाष लोढा, अशोक खिवसरा, भास्कर कोळी, रविंद्र गुजराथी, गुणवंत टोंगळे, जितेंद्र कोठारी, शांतीलाल बिनायक्या, अजय राखेचा, श्रेयस कुमट, सागर पगारिया, कल्याणी नागुलकर, दीपिका चांदोरकर, रंजना देशमुख, आर. जे. पवार आदींसह व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर पाटील व इतर सहकारी यांची उपस्थिती होती.



















