
जळगाव : प्रतिनिधी
स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या “हर घर तिरंगा” या उपक्रमात सहभागी होत जळगांव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे आज ॲथलेटिक्स खेळाच्या पंचांना विनामूल्य राष्ट्रीय तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले.
जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.पी.आर.चौधरी, उपाध्यक्ष प्रा.हाजी ईकबाल मिर्झा, सचिव राजेश जाधव, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे यांच्या हस्ते पंचांना ध्वज देण्यात आले. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरावर ध्वज लावावा तसेच ध्वज संहितेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे डॉ.चांदखान पठाण, जिल्हा ॲथलेटिक्स पंच समिती प्रमुख प्रा.वसीम मिर्झा, राष्ट्रीय खेळाडू बन्सीआप्पा माळी, प्रा.हरिश शेळके, योगेश सोनवणे, प्रा.समीर घोडेस्वार, गिरीश महाजन, नितीन पाटील, NIS टेबल टेनिस प्रशिक्षक विजय विसपुते, राष्ट्रीय खेळाडू संजय मोती, प्रा.हाजी ताज्युद्दीन शेख, अजय काशीद, पंकज वराडे, साजिद पठाण यांची उपस्थिती होती.




















