
पारोळा : प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हरित जळगाव सन २०२२-२३ या योजनेअंतर्गत आमच्या जि.प.शाळा हिवरखेडे बु!! येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हरित जळगाव मोहिमेअंतर्गत वृक्ष लागवड करणे कामी तहसीलदार नितीन देवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जि.प.शाळा हिवरखेडे बु!!.या शाळेला कै.द.ना.भोई प्रतिष्ठान बहादरपूर यांच्यातर्फे प्रा.श्री.सुनील मोरे सर पर्यवेक्षक, जयहिंद हायस्कूल व कॉलेज धुळे यांनी हिरवी शाळा व हरित गावासाठी 101नारळाची रोपे भेट दिली. सदरील वृक्षारोपणासाठी धरणगावचे तहसीलदार नितीन देवरे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदर प्रसंगी तहसीलदार देवरे यांनी संपूर्ण शाळा डिजीटल करून देण्याचा व सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे शब्द दिला..
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक जयहिंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्रा.श्री.सुनिल मोरे , निसर्ग समिती अध्यक्ष प्रा.श्री.प्रितम चौधरी, सेवानिवृत्त प्राचार्य प्रा.श्री एम.पी.शिवदे, केंद्रप्रमुख भिलाली भटू पाटील, भिलाली उपसरपंच सुभाष पाटील, ग्राम पंचायत सदस्य भिलाली आस्तिक पाटील, हिम्मत नाना, दामू भोई, माध्यमिक विद्यालय उपशिक्षक श्री विकास पाटील, मुख्याध्यापक केंद्रशाळा श्री सुनील वाणी, मुख्याध्यापक दगडू पाटील, उपशिक्षक ईश्वर धोबी, अंगणवाडी सेविका.सौ.रूपाली पाटील व गावातील पालक यांची उपस्थिती होती.




















