
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेले गेंदालाल मिल परिसरात काही चोरटयांनी घरफोडी करून रोख रक्कम, साड्या आणि घरातील वस्तू असा एकुण ११ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहररातील गेंदालाल मिल परिसरात रहिवासी मंगल अभिमन भालेराव (वय ५७) हे आपल्या कुटुंबीयांसह राहायला आहे. ते मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. ४ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून २० हजार रुपयांची रोकड, सिलिंग फॅन आणि घरातील भांडे असा एकूण २२ हजार ८०० रुपये किमतीची मुद्देमाल चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
याप्रकरणी मंगल भालेराव यांनी शनिवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे करीत आहे.





















