
जळगाव : प्रतिनिधी
देशभर आझादी का अमृत महोत्सव निमित्त ‘हर घर तिरंगा’ या मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यात जळगावातील सर्वच शाळेमध्ये सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते ‘तिरंगा’ वाटप करीत आहे. शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिटणीस योगेश साळी यांच्यातर्फे प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलमध्ये तिरंगा वाटप करण्यात आले.
दि. १३ रोजी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिटणीस योगेश साळी यांच्यामार्फत शाळेला दोन मोठे झेंडे व शालेय विद्यार्थी यांना ध्वज देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल, मंगला जुनाखे, माजी महापौर तथा नगरसेवक अश्विन सोनवणे, नरेंद्र शिंदे, विशाल वाघ
यांच्यासह व शाळेचे शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.




















