जळगाव : प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व आणि जळगाव तालुका शाखेच्या वतीने कानळदा गावातील प्रशांत पार्क, ईदगाव रस्ता, खंडाळे प्लॉट येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वृक्ष लागवड करण्यात आली.
याप्रसंगी कानळदागावचे उपसरपंच आनंदा सपकाळे, भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्वचे कर्तव्यदक्ष जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र जाधव, जळगाव तालुका अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य जगदीश सपकाळे, ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त शिक्षक आ.बा. सपकाळे, ज्येष्ठ नागरिक शामराव बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र बिऱ्हाडे, सचिन न्हावकर, आनंदा सोनवणे, रामा सोनवणे यांची उपस्थिती होती.