पाचोरा : प्रतिनिधी
जळगावहुन मुला सोबत दुचाकीने पिंपळगाव (हरेश्र्वर) येथे नवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या ६४ वर्षीय वृद्ध महिला ही लोहारी गावानजीक चालत्या दुचाकीवरून पडल्याने डोक्यास गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना दि. १५ आॅगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुप्रीम काॅलनीतील रहिवासी प्रमोद दिनकर बडगुजर हे दि. १५ आॅगस्ट रोजी पिंपळगाव (हरेश्र्वर) येथील आपल्या शालकाच्या मुलाचा नवस असल्याने या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आई सुशिलाबाई दिनकर बडगुजर (वय – ६४) यांना दुचाकी (क्रं. एम. एच. १९ – डी. बी. ११८८) ने जळगांव येथुन निघाले. दरम्यान सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील लोहारी गावानजीक मोटरसायकल ही स्पिड ब्रेकरवर आदळली असता मागे बसलेल्या सुशिलाबाई बडगुजर ह्या खाली पडल्या. त्यांचे डोक्यास जबर मार लागल्याने सुशिलाबाई यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सुशिलाबाई बडगुजर यांना तात्काळ रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी सुशिलाबाई बडगुजर यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रंमाकाने पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली आहे.