• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

लवकरच सुरू होणार खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या पुलाचे काम ;ना. गुलाबराव पाटील यांची माहिती

११५ कोटी रूपयांचा तापी नदीवर होणार पूल; जळगाव व चोपडा तालुकावासियांना ठरेल वरदान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 19, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सरकारी योजना
0
लवकरच सुरू होणार खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या पुलाचे काम ;ना. गुलाबराव पाटील यांची माहिती
Share on FacebookShare on Twitter

जळगाव :  प्रतिनिधी 

चोपडा आणि जळगाव तालुकावासियांना वरदान ठरणार्‍या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणार्‍या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील पुलाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. यासाठी राज्य सरकारने तब्बल ११५ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता दिली असून यामुळे हजारो नागरिकांचा मोठ्या प्रमाणातील फेरा वाचणार आहे. या पुलाच्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश अर्थात वर्क ऑर्डर प्रदान करण्यात आली असून लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक पुलाच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना तापी नदीवरील खेडी-भोकरी ते भोकर दरम्यान पूल बांधण्याचे आश्‍वासन दिले होते. या अनुषंगाने त्यांनी चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे , माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या सोबत सातत्याने पाठपुरावा सुरू केला. यात संबंधीत पूल हा जलसंपदा व सार्वजनीक बांधकाम या दोन्ही खात्यांनी प्रत्येकी ५० टक्के वाटा उचलावा असा निर्णय झाला होता. यानंतर या कामाला प्रशासकीय मान्यता आणि नंतर तांत्रिक मान्यता मिळून याची निविदा काढण्यात आले. या कंत्राटदाराला १३ जुलै २०२२ रोजी कार्यारंभ आदेश म्हणजेच वर्क ऑर्डर प्रदान करण्यात आली आहे. पावसाळा संपताच या कामाचे विधीवत उदघाटन मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

अनेक दशकांपासूनची मागणी
चोपडा-खेडीभोकरी-भोकर-आमोदा-कानळदा-जळगाव हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक-४० या नावाने ओळखला जातो. या रस्त्यावरील किलोमीटर १४/५०० दरम्यान तापी नदी पुलावरील खेडी-भोकर या दोन गावांना जोडणार्‍या पुलाचा प्रश्‍न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबीत होता. परिसरातील हजारो शेतकरी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. वास्तविक पाहता, खेडी- भोकर ते चोपडा हे अंतर फक्त १५ किलोमीटरचे आहे. मात्र, तापी नदीवरील पुलाअभावी हे अंतर ७० किलोमीटरचे होते. परिणामी शेतकर्‍यांचा व नागरिकांचा वेळ व पैसा देखील खर्च होतो. यात चोपडा मार्गे २४ तर अडावद मार्गे २१ किलोमीटरचा फेरा पडत असतो. शिवाय खेडी भोकर, भादली, कठोरा, किनोद, गोरगावले, गाढोदे, करंज, सावखेडा आदी गावातील शेतकर्‍यांना ये- जा करण्यासाठी सध्या दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. हा पूल झाल्यानंतर चोपडा मार्गे शिरपूरला जाणेही सोयीचे होणार आहे. आजवर जानेवारी ते जून या कालावधीत तापी नदीवर उभारण्यात येणार्‍या तात्पुरत्या पुलामुळे थोडी सुविधा होत असली तरी उर्वरित सहा महिने फेरा चुकविता येत नाही. या बाबींचा विचार करता, खेडी-भोकरी आणि भोकर या दोन गावांना जोडणारा पूल तापी नदीवर उभारावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने आता ही मागणी प्रत्यक्षात साकारणार आहे. हा पूल झाल्यास परिसरातील हजारो ग्रामस्थ व वाहनधारकांचा मनस्ताप दूर होणार असून त्यांना पडणारा फेरा वाचणार आहे. याचा चोपडा, जळगाव व धरणगाव या तीन तालुक्यातील जनतेला लाभ होणार आहे.

असा असेल पूल
तापी नदीवरील खेडी-भोकरी ते भोकर दरम्यानचा पूल हा उंच पूल असून याची लांबी तब्बल ६६० मीटर लांब आहे. यात प्रत्येकी ३० मीटरचे २२ गाळे असणार आहेत.सदर पुलाच्या दोन्ही बाजूस सुमारे ६५० मीटर लांबीचे पोहोच रस्ते असतील. दोन्ही बाजूला भराव टिकवून ठेवण्याकरिता बॉक्स रिटर्न व पाईल फाउंडेशनसह रिटेनिंग वॉल असणार आहे. स्टील रेलिंग रोडसाइड फर्निचर व इतर अनुषंगिक बाबींचा यात समावेश आहे. या पुलासाठी भोकरच्या बाजूने ६०० मीटर तर खेडीभोकरीच्या बाजूने ६२४ किलोमीटर लांबीचे पोचरस्ते देखील करण्यात येणार आहेत.

अविरत गतीने कामे सुरूच राहणार !
खेडीभोकरी ते भोकरच्या दरम्यानचा पूल हा शेतकरी, प्रवासी आणि एकूणच या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या हजारो नागरिकांना सुविधा प्रदान करणारा ठरणार आहे. यातून मी दिलेल्या एका वचनाची पूर्तता होणार असल्याचा मनस्वी आनंद आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रचंड गतीने कामे सुरूच राहणार आहेत. किंबहुना आधीपेक्षा जास्त वेगाने कामे होणार असून यात सदर पुलाचे मोठे काम मार्गी लागत असल्याची बाब लक्षणीय अशीच आहे.

Related Posts

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026
बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

September 7, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group